दीपावलीची बाजारपेठ ग्राहकांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:29 AM2018-11-02T00:29:34+5:302018-11-02T00:29:52+5:30

दीपावली सण जसाजसा जवळ येत आहे. त्याप्रमाणात बाजारपेठ दिवसागणिक अधिक सज्ज होत चालली आहे.

Deepawali market is waiting for the customer | दीपावलीची बाजारपेठ ग्राहकांच्या प्रतीक्षेत

दीपावलीची बाजारपेठ ग्राहकांच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दीपावली सण जसाजसा जवळ येत आहे. त्याप्रमाणात बाजारपेठ दिवसागणिक अधिक सज्ज होत चालली आहे. आणि त्याच प्रमाणात नागरिकांचाही खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शहरातील सिंधी बाजारपेठेत गुरूवारी पहायला मिळाले.
दीपावली सणासाठी लागणाऱ्या वेगवेगळ््या साहित्यांनी दुकानी गजबजल्या आहेत. हिंदू धर्मांमधील सर्वात मोठा दीपावलीचा सण आहे. यामुळे हा सण काही दिवसांवर येताच सणाची लगबग लहान- मोठ्यांमध्ये सुरू होते. दीपावली म्हटले की, घरांवर रोषणाईची सजावट आली. दारासमोर आकाशकंदिल, तोरण आले. लक्ष्मी पूजेसाठी फडी-फडा, लक्ष्मीमूर्र्ती आलीच, या शिवाय सणच पूर्ण होऊ शकत नाही. ते म्हणजे पणत्या, बोलके आले. दारासमोर पांढरी, पोपटी, मोरपंख, निळा, लाल, आॅरेंज, भगवा, मेंदी कलरची रांगोळी आली. यासह अनेक साहित्याने सध्या बाजारपेठ गजबजली असून नागरिकांचाही खरेदीला ब-यापैकी प्रतिसाद मिळत आहे.
यावर्षी दुष्काळी परिस्थिती असली तरी वर्षभराचा सण आहे. म्हणून अनेक जण रिण काढून सण साजरा करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. यंदा पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेतक-यांच्या हाती खरीप पीक आले नाही. पिकांवर वारेमाप केलेला खर्चही मातीमोल झाला. यामुळे शेतकºयांंनी आता रबी पिकांचीही आशा-अपेक्षा सोडली आहे. हे जरी खरे असले तरी नागरिकांचा उत्साह बाजारपेठेत मागील वर्षीच्या तुलनेत थोडासा कमी असल्याचे दिसत आहे. या वर्षीचे बाजारपेठेतील खास आकर्षण म्हणजे चायना आकाश कंदिल आले नसून भारतीय आकाश कंदिल विक्रीसाठी आले आहेत. त्यात विशेष म्हणजे हँडमेड आकाशकंदिल सर्वांचे आकर्षण ठरत आहे.

Web Title: Deepawali market is waiting for the customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.