गैरहजर कर्मचाºयांमुळे कामांचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:29 AM2020-12-31T04:29:52+5:302020-12-31T04:29:52+5:30
मंठा : शहरातील लघु पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचारी सतत गैरहजर राहात असल्यामुळे कामानिमित्त येथे येणाºया शेतकºयांची मोठी गैरसोय होत ...
मंठा : शहरातील लघु पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचारी सतत गैरहजर राहात असल्यामुळे कामानिमित्त येथे येणाºया शेतकºयांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय तालुक्यातील सिंचनाचा प्रश्नही गंभीर निर्माण झाला असून, कोणतेच काम मार्गी लागत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
लघु पाटबंधारे विभागाचे हे कार्यालय पूर्वी वाटूर येथे कार्यरत होते. परंतु, त्या ठिकाणी इतर कोणतेही शासकीय कार्यालय नसल्यामुळे या कार्यालयाकडे कुणाचे लक्ष नव्हते. परिणामी अधिकारी, कर्मचारी कार्यालयात हजर राहत नसल्याच्या तक्रारी शेतकºयांमधून वाढल्या होत्या. यावर मार्ग शोधण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यालय मंठा येथे तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. असे असतानाही या कार्यालयातील उप विभागीय अधिकारी हे औरंगाबादेतून कार्यालय चालवत आहेत. केवळ एक शिपाई वगळता या ठिकाणी कार्यरत असणारे इतर अभियंते आणि कर्मचारी कोणीही कार्यालयात हजर राहत नसल्याच्या तक्रारी पुन्हा शेतकºयांमधून होत आहेत.
मागील काही दिवसांपासून प्रशासनाने पाच दिवसांचा आठवडा केला आहे. असे असतानाही अधिकारी, कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर राहत नाही. शिवाय शनिवार, रविवारसोबत शुक्रवार आणि सोमवार या दिवशी अधिकारी, कर्मचारी सुट्या मारून इतर दिवशी मिटिंग आणि साईडचे निमित्य काम असल्याचे सांगतात. या ठिकाणी तीन अभियंते, एक स्थापत्य अभियांत्रिकी, सहाय्यक एक, कनिष्ठ लिपिक आणि एक शिपाई असे एकूण सात कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, उपविभागीय अधिकारी कायम गैरहजर राहतात. त्यामुळे इतर कर्मचाºयांवर कुणाचे नियंत्रण राहत नसल्यामुळे येथील सर्व कर्मचारी कायमच गायब असल्याचे दिसून येते. याठिकाणी कामानिमित्त येणाºया नागरिकांना शिपायाशिवाय कोणीही भेटत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
या कार्यालयाकडे मागील १५ ते २० वर्षांपासून मंठा तालुक्यातील बरबडा, तळतोंडी, खोरड सावंगी, नागठास आणि पाटोदा येथील प्रकल्पांची कामे असून, अधिकारी, कर्मचाºयांच्या उदासीन धोरणांमुळे ती आजवर अधुरी पडलेली आहेत. लघु पाटबंधारे विभागाच्या या कार्यालया सोबतच मंठा तालुक्यातील इतर कार्यालयातही अधिकारी कर्मचाºयांची हीच अवस्था असल्याने जिल्हाधिकाºयांनी या कार्यालयाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
कोट
खोराड सावंगी येथील पकल्पाचे काम मागील २० वर्षांपूर्वी काम सुरू झाले होते. या धरणाचे काम पूर्ण झालेले आहे. परंतु, धरणातील पाण्याचा प्रवाह थांबविणे बाकी आहे. सदरील काम करण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. यासाठी जिल्हाधिकाºयांना देखील निवेदने दिली आहेत. परंतु, याचा उपयोग झाला नाही.
रामेश्वर राठोड, शेतकरी, नायगाव
आमच्याकडे जास्त काम नसते. त्यामुळे ऑफिसला येऊन काय करणार? आम्ही बाहेर असलेल्या मिटिंग करून साईडवरच काम करत असतोत. आम्हाला ऑफिसमध्ये बसून चालत नाही, आमचे वाघमारे विश्वासू अभियंते असून, ते सर्व कामे पाहुन घेतात.
डी. एन. श्रीवास्तव, उपविभागीय अधिकारी, लघु पाटबंधारे विभाग, मंठा
पाच दिवसांचा आठवडा झाल्यापासून शासकीय कर्मचाºयांच्या सुट्ट्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, इतर दिवशी शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार अधिकारी, कर्मचारी कार्यालयात येत नसतील तर खपवून घेतले जाणार नाही. कर्मचाºयांवर लक्ष ठेवून तहसीलदारांकडून संबंधित कार्यालयाचा पंचनामा करून कडक कार्यवाही करण्यात येईल.
प्रल्हाद बोराडे, संचालक, कृउबा समिती, मंठा