वाडीवस्त्यांना वीज, पाणीपुरवठा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:04 AM2021-09-02T05:04:26+5:302021-09-02T05:04:26+5:30
देऊळगाव राजा : देऊळगाव मही येथील संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पातील बुडीत क्षेत्रामधील गाव आणि वाडीवस्त्यांना विद्युत आणि पाणीपुरवठा ...
देऊळगाव राजा : देऊळगाव मही येथील संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पातील बुडीत क्षेत्रामधील गाव आणि वाडीवस्त्यांना विद्युत आणि पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सिंनगाव जहागीर सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य शीला शिंपणे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
सिंचनासाठी खडकपूर्णा धरण अग्रगण्य मानले जाते; परंतु बुडीत क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावे, वाडीवस्त्यांना वीजपुरवठा करता येत नाही. बुडीत क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गारगुंडी, मेहुणा राजा, टाकरखेड भागिले, सिंनगाव जहागीर, वाणेगाव, देऊळगाव महीचा काही परिसर, चिंचखेड पूर्व आणि पश्चिम, सुलतानपूर, खल्याळ गव्हाण, बायगाव खुर्द, ईसरूळ, मंगरूळ, मंडपगाव आदी गावे येतात. प्रकल्पबाधित बुडीत क्षेत्रामध्ये दोन हजार हेक्टर सिंचन क्षेत्र आहे. परंतु निर्धारण अहवालानुसार वीजपुरवठा बंद असल्यामुळे प्रकल्पबाधित गावाचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे शिंगणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
फोटो