कुंपणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:21 AM2021-06-24T04:21:09+5:302021-06-24T04:21:09+5:30
बदनापूर : सफाई कामगारांना सेवेत कायम करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात ...
बदनापूर : सफाई कामगारांना सेवेत कायम करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी प्रकाश मगरे, संतोष शेळके हजर होते.
योग दिन साजरा
बदनापूर : येथील कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सोमवारी योग दिन साजरा करण्यात आला. अर्चना घनवट यांनी योगासने करून दाखविली. याप्रसंगी डॉ. एन. डी. देशमुख आदी उपस्थित होते.
पेरणीची लगबग
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री, शहागड व गोंदी परिसरात उशिरा पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पेरणी करण्यास शेतकऱ्यांना उशीर झाला आहे. सध्या शेतकरी पेरणी करण्यात व्यस्त आहेत.
धोकादायक विद्युत डीपी
जालना : शहरांतर्गत प्रमुख मार्गावर असलेल्या महावितरणच्या विद्युत डीपी उघड्या राहत आहेत. या उघड्या डीपींमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या डीपी कुलूपबंद ठेवाव्यात, अशी मागणी होत आहे.
नूतन वसाहत येथील रस्त्यावर खड्डे
जालना : शहरातील अंबड चौफुली ते रेल्वे उड्डाणपूल, स्वामी विवेकानंद चौक या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जालना पालिकेकडून रस्त्याची नेहमी डागडुजी करून बोळवण केली जात आहे.
रस्त्यावर खड्डे
जालना : तालुक्यातील बाजीउम्रदकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे.