विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:35 AM2021-09-24T04:35:27+5:302021-09-24T04:35:27+5:30
मागील दीड वर्षापासून देशातील महाविद्यालये बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकाने उचलली आहे. केंद्र सरकार राज्यांना ...
मागील दीड वर्षापासून देशातील महाविद्यालये बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकाने उचलली आहे. केंद्र सरकार राज्यांना लसींचा पुरवठा करत असून, त्या पुरवठ्यानुसार लसीकरण सुरू आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणारा पुरवठा यांमध्ये सातत्याने तफावत आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान म्हणजे एका पिढीचे नुकसान. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी महाविद्यालये सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव, तालुकाध्यक्ष आकाश चित्ते, अरविंद खांडेभराड, सचिन कोल्हे, अजित वायाळ, विनोद गायकवाड, शुभम गायके, तुषार देशमुख, संदीप शिंगणे, रवी गिरे यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांच्या सह्या आहेत.