जनावरे चोरणाऱ्यांच्या बंदोबस्ताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:58 AM2021-03-04T04:58:04+5:302021-03-04T04:58:04+5:30

सूचनांकडे दुर्लक्ष जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मास्क वापरासह इतर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने ...

Demand for protection of animal thieves | जनावरे चोरणाऱ्यांच्या बंदोबस्ताची मागणी

जनावरे चोरणाऱ्यांच्या बंदोबस्ताची मागणी

Next

सूचनांकडे दुर्लक्ष

जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मास्क वापरासह इतर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. परंतु, अनेक नागरिक मास्क न घालता बाहेर पडत असून, गर्दीही केली जात आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन

आष्टी : येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने भूमिगत गटार योजनेसह इतर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या विकास कामांना अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविली जाणार आहेत. त्यामुळे संबंधित अतिक्रमणधारकांनी आपले नुकसान हाेऊ नये, यासाठी स्वत:हून अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

विस्कळीत सेवेचा गाहकांना फटका

जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे एकमेकांशी संपर्क साधणे मुश्किल होत असून, इंटरनेटचाही वापर करता येत नाही. इंटरनेटअभावी शासकीय, निमशासकीय कामांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधितांनी लक्ष देऊन सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Demand for protection of animal thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.