महाराष्ट्रात दर्जेदार मत्सबीज उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:17 AM2019-07-13T00:17:34+5:302019-07-13T00:19:42+5:30

महाराष्ट्राला जवळपास ७२० किलोमिटरचा समुद्र किनारा लाभाला असून, महाराष्ट्रात अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये मत्स्यबीज सोडून त्यातूनही मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, अशी मागणी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली.

Demand for providing quality meat seeds in Maharashtra | महाराष्ट्रात दर्जेदार मत्सबीज उपलब्ध करून देण्याची मागणी

महाराष्ट्रात दर्जेदार मत्सबीज उपलब्ध करून देण्याची मागणी

Next
ठळक मुद्देअर्जुन खोतकर : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची दिल्लीत घेतली भेट

जालना : महाराष्ट्राला जवळपास ७२० किलोमिटरचा समुद्र किनारा लाभाला असून, महाराष्ट्रात अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये मत्स्यबीज सोडून त्यातूनही मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, अशी मागणी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. त्यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरिराज सिंह यांची भेट घेतली. त्यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही सिंह यांना दिले.
यावेळी खोतकर आणि सिंह यांच्यात अर्धातास चर्चा झाली. महाराष्ट्रात बंदर विकासाला देखील मोठी चालना मिळू शकते. असे सांगून पशुसंवर्धन वाढीसाठी देखील अनेक संधी असल्याचे खोतकर म्हणाले. परदेशातील मत्स्यबीज महाराष्ट्रात उपलब्ध करून दिल्यास दर्जेदार माशांची निर्मिती होऊन कोळी बांधवांना मोठी मदत होऊ शकते. दरम्यान राष्ट्रीय पातळीवरील पशुप्रदर्शन आम्ही यशस्वीरित्या भरवल्याची माहिती दिली.
यावेळी केंद्रीय मंत्री सिंह यांच्या समोर खोतकरांनी मिरकवडा बंदर दुरूस्तीच्या ९४ कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यासह राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत जनावरांच्या पाय आणि तोंडांच्या आजारावर मात करण्यासाठी महाराष्ट्राने स्वतंत्र आराखडा तयार केला आहे, त्यालाही मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली.
या सर्व मागण्या महत्वपूर्ण असून, आपण या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून हे सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी दिल्याचे खोतकरांनी स्पष्ट केले. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: Demand for providing quality meat seeds in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.