अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:11 AM2021-08-02T04:11:17+5:302021-08-02T04:11:17+5:30
मंठा : तालुक्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून ...
मंठा : तालुक्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी नायगाव येथील शेतकऱ्यांनी मंठा तहसीलदार सुमन मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नायगावसह तालुक्यातील अनेक गावांत अतिवृष्टीमुळे शेतजमिनी वाहून गेल्या असून, कोवळ्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, अद्याप प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले नाहीत. नायगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाझर तलावातील सांडव्याचे व नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर विजय देशमुख, नारायण फुफाटे, उत्तम राठोड, हरिभाऊ राठोड, मधुकर देशमुख, रामदास देशमुख, गुलाब देशमुख, बबनराव देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.