वन क्षेत्रातील कामास मान्यतेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:46+5:302021-01-17T04:26:46+5:30

देऊळगाव राजा : सद्यस्थितीत चिखली- देऊळगाव राजा- जालना या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. असे असताना या महामार्गावरील ...

Demand for recognition of forest work | वन क्षेत्रातील कामास मान्यतेची मागणी

वन क्षेत्रातील कामास मान्यतेची मागणी

Next

देऊळगाव राजा : सद्यस्थितीत चिखली- देऊळगाव राजा- जालना या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. असे असताना या महामार्गावरील वनक्षेत्रात येणाºया चौपदरीकरणासाठी अद्यापही मान्यता न मिळाल्याने हा महामार्ग पूर्णत्वास जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. वेळीच वनविभागाने अडविलेल्या कामास मान्यता देण्यात येऊन रस्त्याचे काम पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी वने व भूखंड पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. चिखली ते जालना या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणातून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु, महामार्ग अंतर्गत ज्या- ज्या ठिकाणी वनविभागात एक क्षेत्र आहे. त्या- त्या ठिकाणी संबंधित विभागाने रस्ता कामास मान्यता दिली नाही. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम रखडलेले आहे. दरम्यान सद्यस्थितीत राहेरी पुलावरील जड वाहतूक बंद असल्याने त्या मार्गावरील सर्व जड वाहतूक जालना- चिखली मार्गे मेहकर अशा पद्धतीने सुरू असल्याने प्रचंड प्रमाणात वर्दळ वाढलेली आहे. वनविभागाने अडविलेल्या ठिकाणे एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. या पार्श्वभूमीवर शशिकांत खेडेकर यांनी वने भूखंड पुनर्वसन मंत्री राठोड यांची भेट घेतली आहे.

Web Title: Demand for recognition of forest work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.