राजूर येथील भारनियमन बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:33 AM2018-10-13T00:33:28+5:302018-10-13T00:34:20+5:30
महावितरण कंपनीने कृषीपंपासह गावात भारनियमन सुरू केल्याने सार्वजनिक पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासह नवरात्र उत्सवा निमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या उत्सवावर विरजण पडले आहे. तातडीने भारनियमन बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता यांना निवेदनाव्दारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : महावितरण कंपनीने कृषीपंपासह गावात भारनियमन सुरू केल्याने सार्वजनिक पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासह नवरात्र उत्सवा निमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या उत्सवावर विरजण पडले आहे. तातडीने भारनियमन बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता यांना निवेदनाव्दारे केली आहे.
गेल्या आठवड्यापासून महावितरणे कृषीपंपासह गावात अवास्तव भारनियमन सुरू केले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.याचा पाणीपुरवठयावर परिणाम होत आहे. अगोदरच राजूरात पाण्याचा दुष्काळ आहे. त्यात भारनियम करण्यात येत असल्याने ग्रामस्थांत संंताप व्यक्त केला जात आहे. यावर्षी पावसाअभावी विहीरींना घरघर लागलेली असतांना अवास्तव भारनियमन कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच गावात भारनियमन सुरू केल्याने नवरात्र उत्सवा निमीत्त आयोजित कार्यक्रमात निरूत्साह पसरला आहे. वीज नसल्याने नवरात्रातील सांस्कृतीक व धार्मीक कार्यक्रमाचे परिणाम झाला आहे. रात्री दहा वाजेपर्यंत विजपुरवठा बंद राहात असल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांत अनूचित प्रकाराच्या भितीने चिंता व्यक्त केली जात आहे. सदर भारनियमन बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली. निवेदनावर गजानन नागवे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, श्रीराम पुंगळे, उपसरपंच विनोद डवले आदीसह ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत.