त्या पीडितेसह समाजाची बदनामी थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:42+5:302021-03-07T04:27:42+5:30
या निवेदनात म्हटले आहे की, पीडित युवती हिचे अशोभनीय वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, ऑडिओ क्लिप सध्या प्रसार माध्यमातून प्रसारित करून ...
या निवेदनात म्हटले आहे की, पीडित युवती हिचे अशोभनीय वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, ऑडिओ क्लिप सध्या प्रसार माध्यमातून प्रसारित करून वाटेल, तशी बदनामी करून तिचे नाव व जातीचा उल्लेख वारंवार केला जात आहे. यामुळे पीडित व समाजाची बदनामी केली जात आहे, तसेच चित्रा वाघ, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर इतर भाजपच्या नेत्यांनी विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सदर पीडित मुलीचे चारित्र्यहनन करीत आहे. तरीही पीडित मुलीसह समाजाची बदनामी थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनावर सुधाकर जाधव, श्याम आढे, विकास राठोड, महेश आढे, बालाजी आढे, प्रधान राठोड, गोरख चव्हाण, देवराव राठोड, संजय चव्हाण, मिथुन चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
===Photopath===
060321\06jan_20_06032021_15.jpg
===Caption===
फोटोपरतूर तालुक्यातील आष्टी येथे पोलीस ठाण्यास निवेदन देताना बंजारा समाजबांधव