भोजन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:12+5:302021-03-05T04:30:12+5:30
खडकी येथे व्याख्यान जालना : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील खडकी येथे व्याख्याते सुदर्शन भांबळे ...
खडकी येथे व्याख्यान
जालना : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील खडकी येथे व्याख्याते सुदर्शन भांबळे यांचे नुकतेच व्याख्यान पार पडले. याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके, शेतकरी संघटनेचे गजानन राजबिंडे, शिवसंग्राम संघटनेचे सचिन खरात आदी उपस्थित होते.
अंगणवाडीमध्ये तेलाचा पुरवठा करा
जालना : घनसावंगी शहरातील अंगणवाड्यांमध्ये अगोदर सकस आहारात बालकांना तेलाचा पुरवठा होत होता. आता तेल ऐवजी साखर येत आहे. शासनाने तेलाचा पुरवठा करावा, अशी मागणी अंगणवाडी सेविका मंगल नामदेव गायकवाड यांनी केली आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नाभिक महामंडळाच्या तालुकाध्यपदी बिडवे
जालना : महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांच्या आदेशानुसार मंठा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यक्षपदी गंगाराम बिडवे, उपाध्यक्षपदी मुरलीधर बिडवे, शहराध्यक्षपदी केशव पंडित, उप शहराध्यक्षपदी संतोष वाघमारे यांचा समावेश आहे. या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी
बदनापूर : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अवैध दारू विक्रीमुळे युवा पिढी व्यसनाधीन होत असून, तळीरामांमुळे भांडण तंट्यातही वाढ होत आहे. याचा महिला, मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दीपक पटवारी यांचा सत्कार
जालना : जालना पिपल्स बॅंकेचे वरिष्ठ लिपिक दीपक मोहनलाल पटवारी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा बॅंक प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक भुरेवाल, सुभाष वाघमारे, संजय मुथा, अभय करवा, सुनील चौधरी, वैशाली राठी, चंद्रप्रकाश सोडणी, कैलास अग्रवाल, खुशाल उदावंत, गणेश लाहोटी, राजेंद्र डहाळे, सत्यनारायण बियाणी, राम जाजू आदी उपस्थित होते.
‘बेटी बचाव बेटी पढाओ’ अभियानाला सुरूवात
जालना : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ चित्ररथाचे आगमन जालना तालुक्यातील नंदापूर येथे झाले. यावेळी सारिका देवेंद्र कटके, पं.स. सदस्य कैलास उबाळे यांनी हिरवा झेंडा दाखवून सदर चित्ररथ कडवंची गणातील गावात रवाना करण्यात आला. यावेळी बाल विकास अधिकारी वाघमारे, माजी जि.प. सदस्या यशोदा उबाळे, मुख्याध्यापक बावकर, कुशीवर्ता घोंगे, बबीता कसार आदींची उपस्थिती होती.
अपंग व दिव्यांगांना लस देण्याची मागणी
जालना : कोरोनाची लस अपंग व दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शंकर साहेबराव शिरगुळे यांनी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कोरोनाच्या काळात अपंगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे शासनाने अपंग व दिव्यांग व्यक्तींना तातडीने लस द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.