आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:29 AM2021-04-10T04:29:24+5:302021-04-10T04:29:24+5:30
जेईएसमधील विद्यार्थिनींचे यश जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत स्पर्धेत जेईएस महाविद्यालयातील पाच विद्यार्थिनींनी ...
जेईएसमधील विद्यार्थिनींचे यश
जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत स्पर्धेत जेईएस महाविद्यालयातील पाच विद्यार्थिनींनी यश संपादित केले आहे. त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी
वालसावंगी : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहन चालक भरधाव वेगात वाहने चालवित असल्याने हा अपघाताचा धोका वाढला आहे. वाढलेले अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी गतिरोधक तयार करावे, अशी मागणी राम म्हस्के, समाधान वैद्य, संजय जैस्वाल, गणेश हिवाळे, गणेश वाघ, नागेश कोठाळे आदींनी केली आहे.
मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी
जालना : शहरांतर्गत भागातील प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसत आहेत. शिवाय मुख्य बाजारपेठेत ही मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. याचा पादचारी नागरिकांसह व्यापारी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब पाहता नगर पालिकेतील संबंधित विभागाने लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.