मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ संस्थेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:49 AM2019-08-05T00:49:05+5:302019-08-05T00:49:31+5:30
सेव मेरिट सेव्ह नेशन या चळवळीअंतर्गत मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ संस्थेच्यावतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सेव मेरिट सेव्ह नेशन या चळवळीअंतर्गत मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ संस्थेच्यावतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामध्ये खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय, आरक्षणाची मर्यादा शिक्षण व नोकरीमध्ये संविधानप्रमाणे केवळ ५० टक्क्यापर्यंत आरक्षण हवे, इयरमार्कींग पद्धत संपूर्णपणे बंद करण्यात यावी, यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात व आरक्षित प्रवर्गातील लोकांना आरक्षित जागेचा लाभ घेता येईल, आरक्षित प्रवर्गाप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना शासकीय सर्व योजनांचा जसे की शिष्यवृत्ती, फीस मध्ये सवलत, वसतिगृह, उच्च शिक्षणासाठी विशेष सवलत मिळावी, पदवीत्तर शिक्षणामध्ये आरक्षण संपूर्णपणे बंद करण्यात यावे, सर्व प्रवर्गांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे, २० जानेवारी २०२० मध्ये आरक्षणाची मर्यादा संपत असून, सरकारने श्वेतपत्रिका काढून आरक्षणाची समीक्षा करावी, बोगस प्रमाणपत्रावर होणारे प्रवेश थांबवावेत, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या.