"मराठ्यांच्या पुढं हतबल सरकारने निवडणूका लांबवल्या"; जरांगेंनी पुढचा प्लॅन सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:55 PM2024-08-21T12:55:05+5:302024-08-21T12:55:59+5:30
२९ ऑगस्टची बैठक पुढे ढकलली; निवडणूक लांबल्याने आता मतदारनिहाय घोंगडी बैठका घेणार
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : सरकारने दोन दिवसात नवीन डाव टाकला असून निवडणुकाच डिसेंबरमध्ये ढकलल्या आहेत. आता राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्यांनी निवडणुका लांबवल्यामुळे आपल्याला २९ ऑगस्टची बैठक पुढे ढकलावी लागेल, अशी माहिती मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली. निवडणुक पुढे ढकलन्याचे काही कारण नाही, मराठ्यांच्या पुढे सरकार हतबल झाले आहे आता मतदारसंघनिहाय आपण काम करू. सर्व इच्छुक उमेदवारांनी २४ ऑगस्ट पर्यंत आपले अर्ज घेऊन यावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले.
जरांगे पुढे म्हणाले, सरकार आपल्या भूमिकेची वाट पाहत आहे. आपली रणनीती सुरू असून यावेळेस जे होईल ते होईल. निवडणुकीची घोषणा होण्या अगोदर आपण बैठक ठरवू. आपले डाव सरकारला का कळू द्यायचे? सर्व मराठा समाजाला सांगायचे, त्यांची निवडणूक तारीख जाहीर होईल तेंव्हा बैठक घेऊ. आता २९ ऑगस्ट रोजी बैठक होणार नाही, असेही जरांगे यांनी जाहीर केले.
आता मतदारसंघनिहाय घोंगड्या बैठका
प्रत्येक गावाने ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना नोंदी मिळाल्या नसल्याने तहसीलदारकडे जाऊन जाब विचारा. सरकारवर बेकार वेळ, ते आपल्या भूमिकेवर ते ठरवणार होते.आता आपण मतदारसंघ निहाय घोंगड्या बैठका घेऊ, बैठकीला मी येतो. दीड दोन महिन्यानंतर ठरवू, लढायच की कसे सर्वात मोठा रोष शेतकऱ्याचा आहे. राष्ट्रपती राजवट लागली तर प्रशासक म्हणून तेच बसणार आहेत, असा आरोपही जरांगे यांनी केला.
सरकारने डाव टाकला
यांना बहुतेक आंदोलन रणनिती उघडी करायची होती, म्हणून त्यांनी हा डाव टाकला. आताच आपण आपली रणनिती उघडली करायची नको. निवडणुकी पुढे ढकलन्याचे काही कारण नाही, मराठ्यांच्या पुढे सरकार हतबल झाले आहे. आता मतदारसंघ निहाय आपण काम करू. सर्व इच्छुक उमेदवारांनी २४ ऑगस्ट पर्यंत आपले अर्ज घेऊन यावे. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकत कोणाची नाही. मी संयमी आहे मराठे जर भूमिकेवर उतरले तर पळता भुई थोडी होईल, असा इशारा देखील जरांगे यांनी यावेळी सरकारला दिला.