विकास पॅनलची नऊ जागांवर बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:31 AM2021-01-20T04:31:35+5:302021-01-20T04:31:35+5:30
कुत्र्याला खरूज तळणी : मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील मोकाट कुत्र्यांना गेल्या काही दिवसांपासून खरूज या रोगाची लागण झाली आहे. ...
कुत्र्याला खरूज
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील मोकाट कुत्र्यांना गेल्या काही दिवसांपासून खरूज या रोगाची लागण झाली आहे. वेळीच जिल्हा प्रशासनाने खरूज असलेल्या कुत्र्यांवर उपचार करावेत, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक राठोड यांनी केली आहे.
कोदा ग्रा.पं.मध्ये भाजपला अपयश
आन्वा : भोकरदन तालुक्यातील कोदा येथील ग्रामपंचायतवर मागील १५ वर्षांपासून सत्ता असलेल्या भाजप पक्षाला यावेळेस अपयश आले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रा.प. निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे नऊ सदस्यांपैकी सात सदस्य निवडून आले आहेत, तर भाजपचे केवळ तीन सदस्य निवडून आले आहेत. नव्याने निवडून आलेल्या उमेदवारांचे गाव परिसरातून स्वागत होत आहे.
तीन जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा
आष्टी : वर्षभरापूर्वी तुझ्या भावाने आमच्याविरोधात न्यायालयात साक्ष का दिली? असे म्हणत शिवीगाळ करून, पोटात चाकूने वार केल्याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फुलवाडी (ह.मु.पुणे) येथील मुंजा श्यामराव वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वामन वाघमारे, बाळासाहेब वाघमारे व महेंद्र लहाडे (सर्व रा.फुलवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सर्जेराव वल्टे यांना पुरस्कार प्राप्त
जालना : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या पुण्यातील संस्थेचा दिला जाणारा ऊस विकास अधिकारी पुरस्कार कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याचे ऊस अधिकारी सर्जेराव वल्टे यांना मिळाला आहे. वल्टे या पुरस्काराने सन्मानित होणारे मराठवाड्यातील पहिले अधिकारी आहेत. ते मागील पाच वर्षांपासून अंकुशराव टोपे कारखान्यात कार्यरत आहेत.