राजुरेश्वराच्या दर्शनासाठी भर उन्हात भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:30 AM2018-04-04T00:30:32+5:302018-04-04T00:30:32+5:30

Devotees rush for darshan of Rajureshwar in hot temprature | राजुरेश्वराच्या दर्शनासाठी भर उन्हात भाविकांची मांदियाळी

राजुरेश्वराच्या दर्शनासाठी भर उन्हात भाविकांची मांदियाळी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : मंगळवारीय अंगारिका चतुर्थी निमीत्त मराठवाडयाचे आराध्य दैवत राजुरेश्वराच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोनपऱ्यातुन भाविकांनी गणरायाचा जयघोष करीत गर्दी केली होती. दिवसेदिवस वाढत्या तापमानामुळे गर्दीवर काही प्रमाणात परिणाम झालेला दिसून आला.
मंगळवारीय येणा-या अंगारिका चतुर्थीचे गणेश भक्तांत विशेष महत्वाचे मानले जाते. यासाठी सोमवार दि. २ पासूनच चौहोबाजुनी पायी भाविकांनी राजूरचा रस्ता धरून मोठी गर्दी केली होती. दुपारपर्यंत गणेश भक्तांकडकून देणगी स्वरूपात ६ लाख ५२ हजार रूपये प्राप्त झाल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले. दरम्यान, रस्त्यावरून भाविकांचे पायी लोंढेच्या लोंढे राजूरच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत होते. विविध सेवाभावी संस्था, संघटना व दानशुरांनी पायी येणा-या भाविकांसाठी रस्त्यावर ठिकठिकाणी मोफत चहा, फराळ, आंघोळीसाठी पाण्याची सोय केली होती. सोमवारी रात्रीच राजूरात यात्रेचे स्वरूप आले होेते. भाविकांची उसळलेली गर्दी लक्षात घेऊन गणेशभक्तांनी रात्री दहा वाजेपासूनच दर्शनासाठी रांगा लावण्यास सुरूवात केली होती. रात्री ठीक १२ वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी व गणपती संस्थानचे अध्यक्ष तथा प्रभारी तहसीलदार दिलीप सोनवणे यांच्या हस्ते महाआरती होऊन भाविकां करिता दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. सोमवारी रात्री सुरू झालेल्या गर्दीचा ओघ मंगळवारी सायंकाळी ओसरला. वाढते तापमान, लग्नसोहळे, चैत्र महिन्यातील यात्रेचा गर्दीवर परिणाम झालेला दिसून आला.
म्हस्के दाम्पत्याला पहिल्या दर्शनाचा मान
अंगारिका चतुर्थी निमित्त दर्शन रांगेत उभे असलेल्या समाधान गंगाराम म्हस्के व त्यांच्या पत्नी कविता (रा.वांगी भराडी, ता.सिल्लोड) या दाम्पत्याला पहिल्या दर्शनाचा मान मिळाला. त्यांचा गणपती संस्थानच्या वतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व श्री प्रतिमा भेट देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रभारी तहसीलदार दिलीप सोनवणे, जि.प.सदस्य कैलास पुंगळे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, व्यवस्थापक गणेशराव साबळे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत दानवे, राहुल दरक, जगन्नाथ थोटे, मुकेश अग्रवाल आदी उपस्थित होते.

Web Title: Devotees rush for darshan of Rajureshwar in hot temprature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.