घाणेवाडी जलाशय कोरडाठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:22 AM2019-05-05T00:22:48+5:302019-05-05T00:22:55+5:30
जालना शहराची तहान साधारणपणे १९४० पाासून घाणेवाडी (संत गाडगेबाबा जलाशय) भागवत आहे; परंतु यंदा या तलावातील संपूर्ण पाणी आटले आहे.
जालना : जालना शहराची तहान साधारणपणे १९४० पाासून घाणेवाडी (संत गाडगेबाबा जलाशय) भागवत आहे; परंतु यंदा या तलावातील संपूर्ण पाणी आटले आहे. एका खोल खड्ड्यातील पाणीसाठा वगळता संपूर्ण तलाव कोरडाठाक पडला आहे. पाण्याचा अवैध उपसा तसेच वाढत्या तापमानामुळे जलाशयातील पाण्याचे झपाट्याने होणारे बाष्पीभवन हीदेखील कारणे तलाव कोरडा पडण्यास आहेत. आता हा तलाव पुन्हा पूर्ववत ओथंबून वाहण्यासाठी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत जालनेकर आहेत.