सरकारला सभेत हिंसाचार करायचा होता का?; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 03:09 PM2023-10-16T15:09:00+5:302023-10-16T15:18:11+5:30

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे. 

Did the government want to use violence in the assembly?; Manoj Jarange Patal's serious allegation | सरकारला सभेत हिंसाचार करायचा होता का?; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

सरकारला सभेत हिंसाचार करायचा होता का?; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

अंतरवली-  आमच्या सभेवेळी सरकारने इंटरनेट बंद पाडून सभा फ्लॉप करण्याचा प्रयत्न केला होता, आमचे मोबाईलही बंद केले. एवढी मोठी सभा पहिल्यांदाच झाली. सभेवेळी २७ गावातील वीज पुरवठा बंद केला, सरकारने हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला. 

अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सभा झाली. या सभेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होत. यावेळी सभे ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी भाषण करत, येत्या १० दिवसांच्या आत मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्याची मागमी केली. दरम्यान, आता या सभेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनीही आरोप केले होते. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

दसरा-दिवाळीत मोठा राजकीय धमाका होणार; शरद पवारांना बसणार पुन्हा एकदा धक्का?

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमची सभा सुरू होती, तेव्हा २७ गावातील वीज पुरवठा बंद केला होता. सभेला आलेल्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था आम्हाला करायची होती, पण २७ गावांतील वीज पुरवठा बंद केल्याने आम्हाला पाणीची व्यवस्था करता आली नाही. याची चौकशी करुन संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणीही पाटील यांनी केली.  सभेवेळी मोबाईलही बंद केले, तरीही आमची सभा मोठी झाली. तुम्ही आमचे नेट, लाईट बंद केली तरी तुमचे नेट बंद करायचे जनतेच्या हातात आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले त्यावंळी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला आहे. आता यातील ३० दिवस संपले आहेत. आता पाटील यांनी सरकारला १० दिवसांच्या आत आरक्षणाचा निर्णय घेण्याची मागमी केली आहे. शनिवारी जरांगे पाटील यांची १०० एकर जागेत ही सभा झाली.या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव आले होते. 

Web Title: Did the government want to use violence in the assembly?; Manoj Jarange Patal's serious allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.