डिझेल, पेट्रोलचा टँकर विद्युत खांबावर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:19 AM2018-05-10T01:19:46+5:302018-05-10T01:19:46+5:30

मनमाडहून घनसावंगीकडे पेट्रोल व डिझेल घेऊन जाणारे टँकर धुळे-सोलापूर महामार्गावरील रोहिलागड फाट्याजवळ बुधवारी पहाटे ४ वाजता विद्युत खांबाला धडकून उलटले. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही.

Diesel, petrol tanker hit on electric pole | डिझेल, पेट्रोलचा टँकर विद्युत खांबावर धडकला

डिझेल, पेट्रोलचा टँकर विद्युत खांबावर धडकला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रोहिलागड : मनमाडहून घनसावंगीकडे पेट्रोल व डिझेल घेऊन जाणारे टँकर धुळे-सोलापूर महामार्गावरील रोहिलागड फाट्याजवळ बुधवारी पहाटे ४ वाजता विद्युत खांबाला धडकून उलटले. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही.
विशेष म्हणजे इंधनाने भरलेल्या या टँकर ने विद्युत खांबाला धडक दिल्यानंतर त्यात विद्युत प्रवाह होता. जर टँकरने पेट घेतला असता तर अवघा परिसर जळून खाक झाला असता.
मात्र, पाचोड पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन परिसर गर्दीमुक्त करून वीजपुरवठा खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, घनसावंगी (जि.जालना) येथील सयाजीराव देशमुख यांचा घनसावंगी येथे पेट्रोल, डिझेलचा पंप आहे. बुधवारी टँकरचालक मनमाडहुन घनसावंगीकडे जात असताना पहाटे ४ वाजेच्या सुमारास चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्यामुळे धुळे -सोलापूर महामार्गावरील रोहिलागड फाटा येथे टँकर (एम.एच-२६.एच-६९११) उलटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबाला धडकले. टँकर विद्युत खांबाला धडकले तेव्हा त्यात ६ हजार लिटर पेट्रोल तर ६ हजार लिटर डिझेल होते.
सुदैवाने विद्युत प्रवाह सुरु असलेल्या या खांबाला टँकर धडकल्यानंतर त्याने पेट घेतला नाही. नसता रोहिलागड फाटा परिसर, रोहिलागड, दाभरूळ, थापटी तांड आदी गाव परिसरात मोठी जीवित हानी झाली असती असे सांगण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी घेतली तातडीने धाव
दरम्यान, रोहिलागड फाट्यावर पेट्रोल घेऊन जाणारे टँकर उलटल्याची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे, पोलीस उपनिरीक्षक गोरक्षक खरड, जमादार फोलाने, बनगे, काकडे, कल्याण राठोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसर गर्दीमुक्त केला. तसेच मार्गावरील वाहतूक थांबवून महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित केला. यामुळे पुढील अनर्थ टळला. यासोबतच पोलिसांनी भारत पेट्रोलियमच्या अधिका-यांना अपघाताची माहिती दिली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Diesel, petrol tanker hit on electric pole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.