मेघालयातून थेट मुळगावी; रावसाहेब दानवेंनी पोळा गावात साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 07:39 PM2022-08-26T19:39:17+5:302022-08-26T19:39:35+5:30

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण असलेल्या पोळा या सणासाठी पूर्ण परिवारासह जवखेडा या लहानशा गावात आवर्जून उपस्थित राहिले

Direct from Meghalaya to native place; Raosaheb Danve continued the tradition of celebrating Pola in the village | मेघालयातून थेट मुळगावी; रावसाहेब दानवेंनी पोळा गावात साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली

मेघालयातून थेट मुळगावी; रावसाहेब दानवेंनी पोळा गावात साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली

Next

भोकरदन (जालना) : केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जवखेडा खुर्द या मुळगावी पोळा सण साजरा केला. मंत्री दानवे यांनी गावात पोळ्याच्या सणाला उपस्थित राहण्याची परंपरा कायम राखली आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देशाच्या मंत्रिपदी पोंहचले आहे.  मात्र त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेलीच आहे. ते एक दिवस अगोदर मेघालयात होते तेथून खास शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण असलेल्या पोळा या सणासाठी पूर्ण परिवारासह जवखेडा या लहानशा गावात आवर्जून उपस्थित राहिले आहेत. ग्रामस्थांनी रावसाहेब दानवे व त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांच्या हस्ते मानाच्या बैलाची पूजा करून पोळा सण साजरा केला.

यावेळी जालना बाजार समितीचे उपसभापती भास्करराव दानवे,  आप्पाराव दानवे, मधुकर दानवे, माणिक दानवे, अनिल उबाळे, अमोल शेजुळ यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Direct from Meghalaya to native place; Raosaheb Danve continued the tradition of celebrating Pola in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.