ई-पीक पाहणीबाबत राष्ट्रवादीकडून थेट बांधावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:35 AM2021-09-14T04:35:03+5:302021-09-14T04:35:03+5:30
दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. ही ...
दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. ही बाब लक्षात घेत आता महसूल विभागाने पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र मोबाइल ॲप्लिकेशन निर्मिती केली आहे. मात्र, ई-पीक पाहणीसंदर्भात शेतकरी प्रशिक्षित नाहीत. अनेक शेतकऱ्यांकडे या सोयी-सुविधा नाहीत. यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली असून ई-पीक पाहणीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी नोंदणीसह प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती विधानसभा क्षेत्राध्यक्ष गजानन पवार यांनी दिली.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही ई-पीक नोंदणीमुळे शक्य होणार असल्याचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष गजानन पवार, राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी अरविंद खांडेभराड यांनी दिली.