जालना जिल्ह्यातील आठ कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

By दिपक ढोले  | Published: April 26, 2023 06:13 PM2023-04-26T18:13:27+5:302023-04-26T18:13:46+5:30

पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलिस महासंचालकांकडून पदक जाहीर केले जाते.

Director General of Police Medal announced to eight employees of Jalna district | जालना जिल्ह्यातील आठ कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

जालना जिल्ह्यातील आठ कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

googlenewsNext

जालना : पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील आठ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर करण्यात आले आहे.

पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलिस महासंचालकांकडून पदक जाहीर केले जाते. त्यानुसार या वर्षी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर महासंचालक रजनीश सेठ यांनी सन्मानचिन्ह जाहीर केले आहे. यात जिल्ह्यातील आठ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पदक जाहीर झाले आहे. यात सहायक पोलिस निरीक्षक संतोष जगनाथ धायडे, पोलिस हवालदार ज्ञानोबा हनुमंत बंफनवाड, नानासाहेब गायकवाड, लक्ष्मीकांत गणेश आडेप, मंदा कौतिकराव पवार, भालचंद्र मुकुंदराव बिनोरकर, जयसिंग सीताराम बैस आणि धीरज भोसले यांचा समावेश आहे. या सर्वांचे पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Director General of Police Medal announced to eight employees of Jalna district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.