महासंचालकांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:33 AM2019-03-29T00:33:49+5:302019-03-29T00:34:12+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा राज्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी गुरुवारी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा राज्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी गुरुवारी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतला. पोलिसांनी समाजकंटकांवर केलेल्या कारवाई बाबत समाधान व्यक्त केले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाने प्रत्येक पोलीस परिक्षेत्राची जबाबदारी अतिरिक्त पोलीस महासंचालकांडे दिली आहे. त्यानुसार औरंगाबाद परिक्षेत्रात येत असलेल्या जालना, बीड, परभणी आणि औरंगाबाद या चार मतदार संघाची जबाबदारी एटीएसचे अतिरिक्त महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली आहे.
यामुळे चारही मतदारसंघात पोलीस प्रशासनाने निवडणुकी संदर्भात केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कुलकर्णी दौऱ्यावर आहेत. गुरुवारी जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील सोळा पोलीस ठाण्यातील प्रमुखांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.
तसेच जिल्ह्यातील संवेदनशील मतदार केंद्राची माहितीही त्यांनी जाणून घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, चंपालाल शेवगण, सुनील जायभाये, सोपान बांगर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह सोळा पोलीस ठाणे प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.