जालन्यात वीज वितरण कंपनीचा दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:36 AM2018-10-07T00:36:57+5:302018-10-07T00:37:22+5:30
वीजवितरण कंपनीकडून नादूरूस्त ट्रान्सफार्मर देताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतक-यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असून, यात वानडगाव, देळेगव्हाण, कडेगाव या गावातील संतप्त शेतक-यांनी हे निवेदन देतानाच आत्म दहनाचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वीजवितरण कंपनीकडून नादूरूस्त ट्रान्सफार्मर देताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतक-यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असून, यात वानडगाव, देळेगव्हाण, कडेगाव या गावातील संतप्त शेतक-यांनी हे निवेदन देतानाच आत्म दहनाचा इशारा दिला आहे.
जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण तसेच जालना तालुक्यातील वानडगाव आणि बदनापूर तालुक्यातून कडेगाव येथील हे संतप्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी धडकले होते. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते डॉ. आप्पासाहेब कदम हे देखील त्यांच्या सोबत होते. त्या शेतकºयांनी सांगितले की, आमच्या गावातील ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर ते दुरूस्तीसाठी वीजवितरण कंपनीकडे पाठविले होते. त्यावेळी महिन्याभरापूर्वी आमची तेथे नोंद असतानाही तेथील अधिकारी आणि कर्मचाºयांनी मिलीभगत करून अर्थपूर्ण व्यवहार करून जे ट्रान्सफार्मर आमच्या नंतर दुरूस्तीसाठी आले होते, त्यांना आमच्या अधी वितरीत केले.
आम्ही वीज वितरण कंपनीच्या या धोरणाचा निषेध करत असून, रोस्टरप्रमाणे त्यांनी ते वितरीत का केले नाहीत, असा सवाल केला असता, आॅईल नसल्याचे कारण सांगून आम्हांला तेथून काढून दिले. या सर्व गंभीर प्रकरणाची चौकशी करावी, नसता आम्ही आत्मदहन करू असा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी राजू निंबाळकर, अनिल निंबाळकर, बाबूराव कापसे, भगवान कापसे, किशोर नागवे, अभिमन्यू नागवे तसेच पंडित शिंदे दामोधर नागवे यांच्यासह अन्य २० ते २५ शेतकºयांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. कदम यांनी शेतकºयांना शांत केले.
पाण्या अभावी द्राक्षबाग सुकली
गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अन्य पिकांप्रमाणेच द्राक्ष बागेलाही मोेठा फटका बसला आहे. शेतातील विहीरीत मुबलक पाणी आहे, परंतु गावात वीजपुरवठा नसल्याने ते देता येत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया वानडगाव येथील शेतकºयांनी सांगितली. त्यातच वीजवितरण कंपनीतील भोंगळ आणि अधिकाºयांचे तोंडपाहून मदत करण्या मागील हेतूमुळे आम्ही हतबल झालो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.