‘आत्मा’तर्फे ५ हजार किलो मका बियाणांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:58 AM2018-12-31T00:58:32+5:302018-12-31T00:58:41+5:30

जिल्ह्यात दुष्काळ असल्यामुळे कृषीतंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २६९ लाभार्थ्यांना मका बियाणाचे वाटप करण्यात आले

Distribution of 5 thousand kg corn seed by 'Spirit' | ‘आत्मा’तर्फे ५ हजार किलो मका बियाणांचे वाटप

‘आत्मा’तर्फे ५ हजार किलो मका बियाणांचे वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : यंदा जिल्ह्यात दुष्काळ असल्यामुळे कृषीतंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २६९ लाभार्थ्यांना मका बियाणाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच उगवलेल्या मक्याची कृषी विभागाचे पदाधिकारी वेळोवेळी पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
दुष्काळामुळे यंदा प्रथमच आत्माअंतर्गत पीक प्रात्यक्षिकातून चारा पिकाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्ह्यात २६९ लाभार्थ्यांना एकरी २० किलो मका बियाणे या प्रमाणे ५ हजार ४० किलो बियाणांचे वाटप करण्यात आले असून २५२ एकरवर चारा पीक प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे.
कृषीतंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा या योजनेअंतर्गत जिल्हाभरात श्री. संत सावता महाराज लोंढेवाडी, स्वामी समर्थ शेतकरी स्वयं सहायता गट नांदापूर, बळीराजा शेतकरी गट माळीपिंपळगाव इ. २ हजार १२२ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे.
या गटांना वेळोवेळी शेततळी मत्स्यपालन, शेळीपालन व कौशल्य आधारित विकास प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच पीक प्रात्यक्षिके घेतली जात आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी कार्यालय सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक दत्तात्रय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

Web Title: Distribution of 5 thousand kg corn seed by 'Spirit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.