शेलुद अंगणवाडीमध्ये पोषण आहाराचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:31 AM2021-04-22T04:31:20+5:302021-04-22T04:31:20+5:30
शेलुद : भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील अंगणवाडीत तीन वर्षांखालील मुलांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांना साखर, मसूर, ...
शेलुद : भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील अंगणवाडीत तीन वर्षांखालील मुलांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांना साखर, मसूर, गहू, हळद, मीठ, मिरची पावडर आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षिका मंगल सोनवणे, अनिता भोंबे, मदतनीस व पालक उपस्थित होते. तालुक्यातील वाढते कोरोनाचे रूग्ण पाहता, नागरिकांनी प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, अशा सूचनाही यावेळी उपस्थितांना देण्यात आल्या.
पारध येथील व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने विनामास्क फिरणाऱ्या २७ जणांची काेविड तपासणी केली. त्यात नऊजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर गावातील व्यापाऱ्यांची अँटिजेन तपासणी सुरू करण्यात आली आहे. यावेळी मनिष श्रीवास्तव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे व अन्य उपस्थित होते. ग्रामस्थांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मापेगाव येथील नागरिकांचे लसीकरण
आंबा : परतूर तालक्यातील मापेगाव (बु.) येथे आयोजित कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा घनवट यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डाॅ. शिवाजी नीलवर्ण, राम अंभुरे, संजय राऊत, आरोग्यसेविका शोभा राऊत, मंजुळा गारूळे, पूजा भेंडेकर, डॉ. सत्यभामा वजीर, आशा सेविका सुनीता साकळकर, नाईक आदी उपस्थित होते.