एक कोटी २० लाखांचे अनुदान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:35+5:302021-01-17T04:26:35+5:30
भारज (बु) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी परिसरातील ११ गावे जोडलेले आहेत. पैकी आजवर ९ गावांमधील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळी ...
भारज (बु) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी परिसरातील ११ गावे जोडलेले आहेत. पैकी आजवर ९ गावांमधील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळी अनुदानाच्या पहिल्या टप्प्यातील रक्कम प्रति हेक्टरील दोन हजार ५०० रुपये या प्रमाणे प्राप्त झाली आहे. यात कुसळी येथील ३९६ शेतकऱ्यांना १२ लाख ६ हजार, खापरखेडा २४४ जणांसाठी ७ लाख ३२ हजार, वानखेडा येथील १३६ शेतकऱ्यांना ३ लाख ९१ हजार, पासोडी येथील ७१३ शेतकऱ्यांसाठी १३ लाख ९४ हजार रुपये, भारज खुर्द येथील ३४९ जणांसाठी ७ लाख ९८ हजार, भारज (बु) येथील ८५२ नागरिकांना ११ लाख ९५ हजार, आढा येथील ४८१ शेतकऱ्यांसाठी १७ लाख ४ हजार रुपये, शिंदी येथील ३५४ जणांसाठी ९ लाख ८५ हजार रुपये, अंधारी येथील ४६२ शेतकऱ्यांना १५ लाख ५३ हजार रुपये, अशा एकूण ९ गावांमधील ३ हजार ९९७ शेतकऱ्यांसाठी एक कोटी १९ लाख ५८ हजार रुपयांचे दुष्काळी अनुदानाचे वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. शेतकऱ्यांना वेळेत अनुदान प्राप्त व्हावे, यासाठी बँक निरीक्षक गजानन कळंबे, सुभाष फोलाने, गजानन पायघन हे प्रयत्न करीत आहेत.
या शाखेअंतर्गत येत असलेल्या सवासणी रास्थल या गावातील शेतकऱ्यांचे अद्याप दुष्काळी अनुदान शाखेत प्राप्त झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वेळीच याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन सवासणी व रास्थल येथील शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.