बैठै पथकाच्या उपस्थितीतच ऑक्सिजन सिलिंडरचे रुग्णालयांना वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:30 AM2021-04-21T04:30:18+5:302021-04-21T04:30:18+5:30
प्रारंभी या पथकाकडे संबंधित रुग्णालयाचे ऑक्सिजनच्या मागणी संदर्भातील एक पत्र लागते. हे पत्र तपासून आणि रिकामे सिलिंडर तसेच भरून ...
प्रारंभी या पथकाकडे संबंधित रुग्णालयाचे ऑक्सिजनच्या मागणी संदर्भातील एक पत्र लागते. हे पत्र तपासून आणि रिकामे सिलिंडर तसेच भरून नेत असलेले सिलिंडर याचा लेखाजोखा ठेवला जात आहे. यामुळे ऑक्सिजनचा साठा केवळ रुग्णालयातच पुरविला जात असल्याचे दिसून आले. दरम्यान, जालन्यातील या दोन प्लांटमधून मराठवाड्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांना देखील ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.
पथक तीन शिप्टमध्ये तैनात
जालन्यातील ऑक्सिजन निर्मिती प्लांटवर महसूलचे पथक हे तीन शिप्टमध्ये तैनात आहे. त्यात सकाळी सात ते दुपारी तीन, दुपारी तीन ते रात्री बारा आणि रात्री १२ ते सकाळी सात या वेळेत बैठे पथकातील कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच अचानक अधिकाऱ्यांची भेट देखील राहणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनवर प्रशासनाची अत्यंत बारकाईने नजर आहे.