समाजाने काळानुरुप बदलावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:45 AM2018-02-25T00:45:46+5:302018-02-25T00:46:28+5:30
मराठा समाजाने काळानुरुष बदल स्वीकारून समाजातील धनवंतांनी उद्योग, व्यवसायात गुंतवणूक करुन रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे आद सात ठराव शनिवारी येथे आयोजित विभागीय मराठा प्रतिनिधी परिषदेत घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठा समाजाने काळानुरुष बदल स्वीकारून समाजातील धनवंतांनी उद्योग, व्यवसायात गुंतवणूक करुन रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे आद सात ठराव शनिवारी येथे आयोजित विभागीय मराठा प्रतिनिधी परिषदेत घेण्यात आले.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने जालन्यात प्रथमच मराठा प्रतिनिधी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आ. राजेश टोपे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार, विनायक पवार, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपसभापती भास्करराव दानवे, विष्णू पाचफुले, डॉ. संजय लाखे पाटील, जयंत भोसले, अॅड. हरी काकडे, संयोजक अरविंद देशमुख, स्वागताध्यक्ष जगन्नाथ काकडे, अशोक पडुळ, अॅड. लक्ष्मण उढाण, मुरलीधर शेजुळ, शैलेश देशमुख, संतोष कºहाळे, संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्ज्वलनाने परिषदेचे उघाटन करण्यात आले.
उल्लेखनीय कार्याबद्दल परिषदेर्फे डॉ. संजय लाखे पाटील, विश्वासराव भवर, दत्तात्रय काटे, दीपक मोरे, रावसाहेब कोल्हे, भागवत ठोंबरे, भास्कर मगर, संतोष कोलट, निकीता कुबेर ओमप्रकाश भिसे उद्धव काळपे, विनायक भानूसे यांचा सत्कार करण्यात आला.
सात ठराव
उच्च शिक्षणासाठी समाजाने शिष्यवृत्ती फंड निर्माण करावा, सुशिक्षितांनी मराठा कुटुंबांना मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, सामुदायिक विवाहाचा पुरस्कार करावा, उद्योजकांनी अनुभवाचा फायदा समाजातील गरजुंना द्यावा, सोशल मिडीयाचा वापर सकारात्मक करावा आदी सात ठराव परिषदेत घेण्यात आले.