दिवाळीचा उत्साह शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:02 AM2018-11-07T00:02:40+5:302018-11-07T00:02:53+5:30
सोमवारी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे फुलांची येथे मोठ्या प्रमणात आवक वाढली होती. यामुळे अनेकांनी सोन्यासारखी झेंडू फुले फक्त २० रूपये किलोने विकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती कोणतेच पीक पडले नाही. यातून काही तरी मार्ग काढण्यासाठी शेतक-यांनी झेंडूंची लागवड केली. दीपावलीला यातून चांगले उत्पन्न हाती येईल. ही आशा उराशी बाळगली होती. यामुळे मंगळवारी सायंकाळी शहरातील मार्केटला फुले अनेकांनी उत्साहात विक्रीसाठी आणली. पण, सोमवारी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे फुलांची येथे मोठ्या प्रमणात आवक वाढली होती. यामुळे अनेकांनी सोन्यासारखी झेंडू फुले फक्त २० रूपये किलोने विकली. या फुलांवर केलेल्या खर्चापेक्षा काही तरी पैसे हाती पडेल हीच अपेक्षा यावेळी शेतकºयांच्या चेहºयावर दिसत होती.
शेतकºयांनी केलेली खरीप पेरणी पावसाअभावी वाया गेली. विहिरीने तळ गाठला. यामुळे वर्षेभर काय खायचे? मुलांचा शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा अशी एक ना अनेक प्रश्न बळीराजाला पडली होती. यातून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी झेंडूची शेती करण्याचा मार्ग शोधला. त्या झाडांवर पोटच्या मुलांप्रमाने प्रेम केले. जिवाच रान करून त्याला पाणी दिले. वाढविले. संगोपण केले. दसरा या सणाला या फुलांना ४० ते ६० रूपये दर मिळाला होता.
यात अनेकांची चांदी झाली होती. यामुळे अनेकांनी दिपावली सणाला फुलांना चांगला दर मिळेल.
या आशेने झेंडूच्या झाडाचे संगोपण केल बुधवारी दिपावली असल्याने अनेकांनी पर जिल्ह्यातून झेंडू फुले, शेवंती (पांढरी) फुले, गरांडा फुले, छडी फुले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिंधी बाजार, गांधी चमन, शनि मंदिर, येथे विक्रीसाठी आणली होती. पण सुरूवातीलाच यांना २० ते ३० रूपयांपेक्षा अधिक भाव मिळत नव्हता. यामुळे आणलेली फुले देखील शेवटपर्यंत संपतात की, नाही अशी अनेकांना चिंता मंगळवारी रात्री उशीरा पर्यंत पडली होती.