दुष्काळाला घाबरुन जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:43 AM2018-11-16T00:43:39+5:302018-11-16T00:43:42+5:30
शासन व लोकप्रतिनिधी म्हणून मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सध्या जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना करीत असून जिल्ह्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा असे अनेक गंभीर प्रश्न आपल्या समोर आहेत. अशा गंभीर परिस्थितीत धीर सोडता कामा नये. शासन व लोकप्रतिनिधी म्हणून मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले.
ते माळी महासंघ चंदनझिरा शाखेच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, रशिद पहेलवान, गणेश राऊत, सतिष जाधव, संतोष मोहिते आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, सणवार व अनेक रुढी यांवर अनाठायी होणारा खर्च कमी करुन शिक्षण, आरोग्य अशा आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्यावे. पूर्वीच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा देतांना ते म्हणाले की, समाजात व कुटूंबात एकोपा, संस्कार, शिस्त, सामंजस्य हवे तरच कुटूंबाचा व समाजाचा विकास होऊ शकतो. आजही आपण नाहक अनेक कर्मकांडांत गुंतलो असून त्यामुळे पाहिजे त्याप्रमाणात प्रगती होऊ शकलेली नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, सध्याच्या यांत्रिक युगात माणूस यंत्रासारखा वागत आहे. मनुष्य प्राण्याला भाव भावना असतात. यामध्ये प्रेम, स्नेह भावना जर भावनाच संपल्या तर आपले सर्व सामाजिक स्वास्त्य व समाज रचनाच बिघडून जाईल ही परिस्थितीच आज निर्माण होत आहे. मोठ्या शहरांमध्ये शेजारील अपार्टमेंटमध्ये राहणारा जर मृत्यूुखी पडला तर घरातून दुर्गंधी येईपर्यंत शेजाऱ्याला कळत नाही. रस्त्यावर एखादा अपघात झाला तर मदतीची याचना करणारा अनेक वाटसरुंना हात करतो पण प्रत्येकाला वेळ नसल्यामुळे कुणीही थांबायला तयार होत नाही. रस्त्यावर एखाद्याचे भांडण होत असेल तर सोडवायला कुणी जात नाही. इतका अलिप्तपणाने आज माणूस वागत आहे. यावेळी राजेश राऊत, रशिद पहेलवान, गणेश राऊत यांनीही उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास संतोष जमधडे, राजेंद्र जाधव, जे.के. चव्हाण, गणेश चव्हाण, रितेश पंचारिया, एकनाथ गायकवाड, राजकुमार बुलबुले, रवि तारो, मुवूंष्ठद खरात, संतोष रासवे, विठ्ठलराव दैने, रामेश्वर गाडेकर, सुनिल साबळे, गणेश तांबेकर, आयोजक सचिन दैने, अ?ॅड. दिनेश दैने, भगवान दैने, संतोष काळे, विष्णू तायडे, डॉ. मगर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक खरात यांनी तर सूत्रसंचालन गाडेकर यांनी केले.