पोलिसांना त्रास देऊ नका शांत रहा; पुन्हा अंतरवलीत बैठक घेऊन दिशा ठरवू: मनोज जरांगे
By विजय मुंडे | Published: February 26, 2024 08:38 AM2024-02-26T08:38:26+5:302024-02-26T08:39:37+5:30
अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू, अशी भूमिका पाटील यांनी मांडली.
विजय मुंडे, जालना: उपमुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरून अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. सर्वांनी शांत राहावे पोलिसांना त्रास देऊ नये. अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू, अशी भूमिका पाटील यांनी मांडली.
जरांगे पाटील यांनी सोमवारी सकाळी भांबेरी येथे माध्यमांची संवाद साधला. सरकारने सांगितल्याशिवाय जिल्हाधिकारी संचार मधील लागू करू शकत नाहीत. आम्ही मुंबईकडे येऊ नये म्हणून संचार बंदी लावली आहे. रात्री मोठया प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता. परंतु आपण रात्रीच त्यांचा असलेला वेगळा प्लॅन उधळून लावला आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांनी शांततेत आंदोलन करावे, पोलिसांना त्रास देऊ नाये, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय त्यांना सुट्टी नाही. दोन तासात अंतरवली येथे बैठक घेऊन निर्णय घेऊ असेही जरांगे पाटील म्हणाले.