जालन्यात डॉक्टरांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:58 AM2019-06-18T00:58:12+5:302019-06-18T00:58:21+5:30
जालन्यातील खाजगी डॉक्टरांनी सोमवारी बंद पाळून निषेध व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोलकत्ता येथील डॉक्टरांवर जो हल्ला करून त्यांच्यावर दडपशाहीचे धोरण स्वीकारले त्याचा निषेध म्हणून जालन्यातील खाजगी डॉक्टरांनी सोमवारी बंद पाळून निषेध व्यक्त केला. यावेळी सकाळी मोटार सायकल रॅली काढून, शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ डॉक्टरांनी निदर्शने केली.
सोमवारी सकाळी भोकरदन नाका परिसरातील आयएमए हॉल येथून सर्व डॉक्टरांनी एकत्रित येत मोटारसायकल रॅली काढली.
यावेळी काळ्या फिती लावण्यात आल्या होत्या. या रॅलीची सांगता शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली. यावेळी येथे सर्व डॉक्टरांनी हाती फलक घेऊन झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला.
यावेळी आयएमएच्या अध्यक्षा डॉ. कल्पना भन्साली, सचिव डॉ. उमेश करवा, डॉ. कैलास सचदेव, डॉ. संजय अंबेकर, डॉ.धरमचंद गादिया, डॉ. जयप्रकाश भन्साली, डॉ. अभय सोनी, डॉ. पवार, डॉ. हवालदार, डॉ. एम.जी. मणियार, डॉ. प्रदीप हुसे, डॉ. हितेश रायठठ्ठा, डॉ. कैलास दरगड, डॉ. नीलेश सोनी, डॉ. श्रेयस गादिया, डॉ. डोईफोडे, डॉ. तोतला, डॉ. शाम मानधने, डॉ. मुथा, डॉ. बोरीवाले,डॉ. केंद्रे, डॉ. विजय शिंदे, डॉ. अमोल वाघ, डॉ. गोविंंद पाटील, डॉ. सबनीस, डॉ. पी.आर. सोमाणी, डॉ. अतुल जिंतूरकर, डॉ. मांटे, डॉ. कायंदे, डॉ. राजेंद्र करवा, डॉ. अनिकेत करवा आदींची उपस्थिती होती.