राजूर गणपती संस्थानास सात लाख रूपयांची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:23 AM2019-06-23T00:23:57+5:302019-06-23T00:24:31+5:30
गुरूवारी झालेल्या संकष्टी चतुर्थी निमित्त राजूरेश्वर संस्थानला दानशूर गणेश भक्तांकडून सात लाख २६ हजार ८६४ रूपयांची देणगी मिळाली.
राजूर : गुरूवारी झालेल्या संकष्टी चतुर्थी निमित्त राजूरेश्वर संस्थानला दानशूर गणेश भक्तांकडून सात लाख २६ हजार ८६४ रूपयांची देणगी मिळाल्याची माहिती गणपती संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली.
प्रवेश देणगी एक लाख १५ हजार ३०० रूपये, अभिषेक देणगी ४४ हजार ६४२ रू. बांधकाम देणगी ३० हजार रू. सुबक मार्बल आसन देणगी १२ हजार ५२५ रू, वाहनतळ देणगी १३ हजार ८८० रू. दानपेटी दोन लाख ९७ हजार रू. बांधकाम दानपेटी दोन लाख १२ हजार ७९० रू. अशी एकूण सात लाख २६ हजार ८६४ रूपये देणगी मिळाली. शुक्रवारी राजुरेश्वर मंदिरात देणगी पेट्या उघडल्या असता, वरील देणगी मिळाल्याचे समजले. यावेळी मंडळ अधिकारी पी.जी. काळे, विश्वस्त शिवाजी पुंगळे, व्यवस्थापक गणेश साबळे, प्रशांत दानवे, श्रीरामपंच पुंगळे, भीमराव बारोकर, ज्ञानेश्वर साबळे आदींची उपस्थिती होती.