मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला- मदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:35 AM2021-01-16T04:35:24+5:302021-01-16T04:35:24+5:30
जालना : मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाचे माजी मराठी ...
जालना : मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉ.देवकर्ण मदन यांनी केले.
जालना येथील अंकुशराव टोपे महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठ नामविस्तार दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. प्रारंभी उपस्थितांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन केले. प्राचार्य डॉ.बी.आर. गायकवाड यांनी ग्रंथ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
पुढे बोलताना डॉ.देवकर्ण मदन म्हणाले की, भारतातील परिस्थिती ही मानवाला मानव म्हणून वागविण्यात भेदाभेद करणारी होती. हा भेद नष्ट करण्यासाठी डॉ.आंंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला. यामुळे महाराष्ट्राचे आणि देशाचे सोशल इंजिनीअरिंग पूर्ण झाले. त्यांच्या नावाने विद्यापीठाचा नामविस्तार व्हावा, हे मराठवाड्यातील जनतेचे भाग्य आहे, असेही ते म्हणाले.
डॉ.गायकवाड म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तत्त्वज्ञ, समाजसुधाकर, इतिहासकार, अर्थतज्ज्ञ, राज्यशास्त्रज्ञ आणि घटनाकार होते. अशा सर्व क्षेत्रात पारंगत असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर भावी पिढीला प्रज्ञासूर्या आहेत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.मधुकर गरड यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय डॉ.पंडित रानमाळ यांनी करून दिला. यावेळी नॅक समितीचे प्रमुख डॉ.शहाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ.संजय पाटील, उपप्राचार्य रमेश भुतेकर यांची उपस्थिती होती.
मंठा येथे नामविस्तार दिन साजरा
मंठा : मंठा येथील चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सर्वश्री नगरसेवक अरुण वाघमारे, शिक्षक संघाचे पदाधिकारी गौतम वाव्हळ, गंगा गवळी, बी.के. गायकवाड, अतुल खरात, सिद्दू मोरे, शरद मोरे आदी उपस्थित होते.
फुले महाविद्यालयात अभिवादन
जालना : येथील महात्मा ज्योतिराबा फुले महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अॅड.ब्रह्मानंद चव्हाण, डॉ.एस.आर. कहाडे, डॉ.सुवर्णा चव्हाण, डॉ.स्मिता चव्हाण, डॉ.आर.एन. हिवराळे, डॉ.पी.व्ही. वनंजे, डॉ.पी.टी. शिंदे, डॉ.बी.आर. राठोड, आर.एस. खरात, डब्ल्यु.आर. वाघ, आर.टी. झोरे, के.जी. कुरंगळ, एम. मदन, ग. स. मेहेत्रे, आय. ए. शिंदे, पी. बी. भालमोडे आदींची उपस्थिती होती.
मोरेश्वर महाविद्यालय, भोकरदन
भोकरदन : येथील मोरेश्वर महाविद्यालयमध्ये नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य भगवान डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. डॉ.आरेफ शेख यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगितले. डॉ.सोनकांबळे विद्याधर यांनी नामांतराचा इतिहास यावर माहिती दिली. या प्रसंगी डॉ.आसाराम बेवले, डॉ.विश्वंबर तनपुरे आदींची उपस्थिती होती.