शेतीच्या उत्पन्नवाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:51 AM2018-08-18T00:51:42+5:302018-08-18T00:51:59+5:30
घनसावंगी तालुक्यातील शिंदेवडगाव येथे कृषी कार्यालय तसेच जागृती प्रतिष्ठाण यांच्यावतीने आयोजित मेळाव्यास कृषी अधिक्षक विजय माईनकर, गटशेतीचे प्रणेते डॉ.भगवानराव कापसे यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतीच्या उत्पन्न वाढीसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. असलेले पाणी पिकांना देण्यासाठी ठिबक सिंचन ही आता काळाची गरज झाली असल्याची माहिती जागृती प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक, कृषी खाते यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्यात ग्रामीण बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक जी. जी. वाकडे यांनी सांगितले.
घनसावंगी तालुक्यातील शिंदेवडगाव येथे कृषी कार्यालय तसेच जागृती प्रतिष्ठाण यांच्यावतीने आयोजित मेळाव्यास कृषी अधिक्षक विजय माईनकर, गटशेतीचे प्रणेते डॉ.भगवानराव कापसे यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती. गटशेतीच्या वाटचालीबद्दल डॉ. कापसे यांनी सविस्तर माहिती दिली. जाफराबाद, भोकरदन तालुक्यात गटशेतीचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. या दोन तालुक्यांप्रमाणेच संपूर्ण जालना जिल्ह्यात अॅग्रो इंडिया गटशेतीच्या माध्यमातून देखील प्रयत्न चालले असल्याची माहिती गटप्रमुख लक्ष्मण सवडे यांनी दिली. व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी कावरे, ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक पोटे, कृषी सहाय्यक देठे, सरपंच ओमप्रकाश जाधव, भाऊराव आटपळे, मुन्ना गव्हाणे आदींची उपस्थिती होती.
यावेळी रामकिसन गव्हाणे यांच्या शेतातील ठिबक पध्दतीने लावलेल्या कपाशीची पाहणी मान्यवरांनी केली. श्रीकांत भुतेकर यांच्या शेतातही शिष्टमंडळाने भेट देवून मोसंबी बागेची शिवारफेरी करण्यात आली. कपाशीवरील बोंडअळी व मोसंबीवर पडणारा डायबॅक रोगाविषयी शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जागृती प्रतिष्ठाणचे व्यवस्थापक अमित पालोदकर, सचिव विकास कापसे, सदस्य विलास कापसे, मुन्ना गव्हाणे, सखाराम गव्हाणे, मदन गव्हाने आदींनी प्रयत्न केले. या मेळाव्यास घनसावंगी आणि भोकरदन तालुक्यातील ६०० पेक्षा अधिक शेतकºयांची उपस्थिती होती.