चालकाचा पुराचा अंदाज चुकला अन बस पुलावरून नदीत कोसळली; २३ प्रवासी थोडक्यात बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 09:20 PM2021-09-23T21:20:36+5:302021-09-23T21:25:53+5:30
Bus collapsed in flood : परतूर आगाराची बस २३ प्रवाशांना घेऊन आष्टीकडे गुरूवारी रात्री ८ वाजेच्या बस जात होती.
जालना : परतूर- आष्टी रोडवरील श्रीष्टी गावाजवळील पुलावरून बस नदीत कोसळल्याची घटना गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. पोलीस व ग्रामस्थांनी मदतकार्य करून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
परतूर आगाराची बस २३ प्रवाशांना घेऊन आष्टीकडे गुरूवारी रात्री ८ वाजेच्या बस जात होती. श्रीष्टी गावाजवळ वाहणाऱ्या कसुरा नदीवर असलेल्या लहान पुलाजवळ आल्यावर चालकाचा अंदाज आला नाही. ही बस पुलावरून नदीत कोसळून पाण्यात उलटली.
या ठिकाणी चारफुटावर पाणी होते, ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य करून प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन मदत कार्य केले आहे.