ड्रोन कॅमेऱ्याने शोधले हातभट्टी दारूचे अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 01:08 IST2020-01-09T01:08:39+5:302020-01-09T01:08:54+5:30
कैकाडी मोहल्ला परिसरातील हातभट्टीच्या दारू अड्ड्यांचा शोध पोलिसांनी प्रथमच ड्रोन कॅमे-याव्दारे घेऊन बुधवारी सायंकाळी कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली

ड्रोन कॅमेऱ्याने शोधले हातभट्टी दारूचे अड्डे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुना जालना भागातील कैकाडी मोहल्ला परिसरातील हातभट्टीच्या दारू अड्ड्यांचा शोध पोलिसांनी प्रथमच ड्रोन कॅमे-याव्दारे घेऊन बुधवारी सायंकाळी धडक कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली. यात एक लाख रूपयापेक्षा अधिकचे सािहत्य तसेच दारू तयार करण्यासाठी लागणरे रसायन जप्त केले.
जुना जालना भागातील कैकाडी मोहल्ला परिसरात गेल्या काही महिन्यांपासून हातभट्टीची दारू तयार करण्याचे प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. ही माहिती मिळाल्यावर त्याची खातरजमा करण्यासाठी यावेळी प्रथमच पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या सूचनेनुसार ड्रोन कॅमे-याचा उपयोग करून प्रथम पुरावे हाती घेतले.