दुष्काळी परिस्थितीने मनरेगा कामावर मजुरांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:05 AM2019-03-08T00:05:59+5:302019-03-08T00:06:27+5:30

अंबड तालुक्यातील सुखापुरी महसूल मंडळात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या बांध बंधिस्तीच्या कामावर मजुरांच्या संख्येत वाढ होत आहे.

Drought situation increased the number of laborers on MNREGA work | दुष्काळी परिस्थितीने मनरेगा कामावर मजुरांची संख्या वाढली

दुष्काळी परिस्थितीने मनरेगा कामावर मजुरांची संख्या वाढली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी महसूल मंडळात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या बांध बंधिस्तीच्या कामावर मजुरांच्या संख्येत वाढ होत आहे.
दुष्काळात या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम अंबड पंचायत समिती कडून करण्यात आले आहे. अंबड तालुक्यात या योजनेवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यास्थितीत वडिकाळ्या येथे कामे सुरू आहेत. येथे तब्बल १६० लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दुष्काळामुळे सध्या स्थितीत येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न परिसरात जटिल झाला असून शेतीचे कामकाजही थंडावले असल्याने रोजगार हमी योजनेतील कामांवर नागरिक गर्दी करित आहेत. वडिकाळ््या ग्रा. पं. अंतर्गत सध्या १६० जणांना रोजगार देण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाºया प्रत्येक मजुरास सरासरी दोनशे ते तीनशे रुपये मजुरी प्रती दिवस देण्यात येत आहे. या मजुरीचे पैसे बँकेत होतात.

Web Title: Drought situation increased the number of laborers on MNREGA work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.