पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:19 AM2019-11-12T00:19:12+5:302019-11-12T00:20:18+5:30
भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या खडकेश्वर परिसरातील केळणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एक ९ वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.
भोकरदन : भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या खडकेश्वर परिसरातील केळणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एक ९ वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
शेख निहाद शेख रफिक (१०, रा. उस्मानपेठ भोकरदन) असे मयत झालेल्या झालेल्या मुलाचे नाव आहे. निहाद शेख हा सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्याच्या मित्रांसमवेत पेरजापूर रोडवरील खडकेश्वर परिसरातील केळणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीतील पाण्यात बुडाला. दरम्यान घटना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उपस्थित तरुणांनी पाण्यात उड्या टाकून शोधकार्य सुरू केले. काही वेळातच पोलीस कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी बोट घेऊन घटनास्थळी पोहोचले.
सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुलगा सापडला. त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल मुळे यांनी त्या युवकाला मयत घोषित केले. या घटनेचा तलाठी बोडखे यांनी पंचनामा केला आहे.