भोकरदनमध्ये मनसोक्त बरसला; केळना नदीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:37 AM2019-06-27T00:37:24+5:302019-06-27T00:37:38+5:30

पावसामुळे भोकरदन शहराजवळून वाहणाऱ्या केळना नदीही दूथडी भरून वाहू लागली

Due to heavy rain, Kelana River floods | भोकरदनमध्ये मनसोक्त बरसला; केळना नदीला पूर

भोकरदनमध्ये मनसोक्त बरसला; केळना नदीला पूर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन/दानापूर (जि. जालना) : भोकरदन शहरासह दानापूर परिसरात बुधवारी दमदार पाऊस झाला. रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे भोकरदन शहराजवळून वाहणाऱ्या केळना नदीही दूथडी भरून वाहू लागली आहे. तर दानापूर येथील अनेक घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली होती.
बुधवारी भोकरदनसह दानापूर परिसरात सुमारे पाऊण तास संततधार पाऊस सुरू होता. दानापूर येथे घरात घुसलेले पाणी टोपल्याने काढून अन्नधान्य तसेच इतर संसार उपयोगी वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवल्या. ज्यांच्या घरात हे पावसाचे पाणी शिरले. यात माजी उपसरपंच बालाजी पवार, नामदेव दळवी, अमोल पावर, रशीद शेख , रामराव दळवी, देविदास पवार, चंद्रकांत पवार, पुसाबाई सोनुने यांचा समावेश आहे. दरम्यान, जालना शहरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अर्धा तास पावसाची रिमझिम सुरू होती.

Web Title: Due to heavy rain, Kelana River floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.