अतिवृष्टीमुळे हास्तूर तांडा रस्त्याची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:52+5:302021-07-03T04:19:52+5:30
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी आणि परिसरातील अनेक गावात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेती आणि रस्त्याचे नुकसान झाले ...
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी आणि परिसरातील अनेक गावात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेती आणि रस्त्याचे नुकसान झाले आहे. आष्टी ते हास्तूर तांडा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
आष्टी ते हास्तूर तांडा या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. दोन दिवसांपूर्वी आष्टी व परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. नदी-नाले खळखळून वाहिले. अनेक ठिकाणी शेतजमीन वाहून गेली, तर काही ठिकाणी रस्त्यांसह पूल वाहून गेले आहे. आष्टी ते हास्तूर तांडा रस्त्याची देखील पावसामुळे वाट लागली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रदीप आढे यांनी केली आहे.