पाहुण्यांच्या हाताने दुष्काळमुक्तीचा प्रपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:32 AM2018-12-09T00:32:38+5:302018-12-09T00:32:47+5:30

एका तासाच्या पाहणीत जर त्यांना दुष्काळ कळत असेल तर मग त्यांनी हवाई पाहणी केली असती तरी बराचवेळ वाचला असता अन् मदतही लवकर मिळाली असती

Due to the release of famine without the help of guests | पाहुण्यांच्या हाताने दुष्काळमुक्तीचा प्रपंच

पाहुण्यांच्या हाताने दुष्काळमुक्तीचा प्रपंच

Next

संजय देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठवाड्याची ओळख ही संत-महंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे या भागात दुष्काळ हा जणूकाही पाचविलाच पूजलेला आहे. मराठवाड्याचे भूमीपुत्र आणि माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे पैठण येथे जायकवाडीचे धरण झाले.
यामुळे तरी किमान काही शहरांचा विकास झाला आहे. त्यानंतरचा दुसरा मोठा प्रकल्प म्हणजे निम्न दुधना म्हणता येईल. जायकवाडीतून उजवा आणि डाव्या कालाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल आहे. गोदावरी काठावरील संपन्न शेतीमुळे तरी या भागात नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या ऊसाची लागवड होऊन साखर कारखानदारी बहरली. असे असले तरी मराठवाड्याच्या बहुतांश भागात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हा नवीन नाही. त्यामुळे यंदा आपण केवळ जालना जिल्ह्याचाच विचार केल्यास केवळ ६१ टक्के पाऊस पडला आहे.
खरीप हंगामात पेरणी केल्यावर आणि हवामान खात्याच्या शंभर टक्के पर्जन्यमानाच्या अंदाजाने सर्वजण सुखावले होते. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार हजेरीही लावली. परंतु नंतर त्याने पाठ फिरवली त्यामुळे बळीराजा पिळून निघाला. रबी हंगामात तर पावसाने पेरणी योग्य शिडकावाही केला नाही. त्यामुळे रबीचा विषय संपला आहे. कपाशीची लागवड जिल्ह्यात ३ लाख हेक्टरवर तर १ लाख ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. मात्र, ५० टक्केपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकºयांचे डोळे पांढेरे झाले आहेत. लावलेला खर्चही निघालेला नाही. त्यामुळे आता सर्वस्व अवलंबून हे माय-बाप म्हणविणा-या सरकारवर आहे. पिकविमा, तसेच दुष्काळी अनुदानाच्या माध्यमातून मदतीची आशा आहे. जिल्ह्यातील ९७० गावातील आणेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. या दुष्काळात राज्यातील शेतकºयांना मदत मिळावी म्हणून राज्य सरकारकडून सात हजार कोटींचा प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले. जात आहे. त्यामुळे हे पॅकेज मिळाल्यास किमान दुष्काळ तरी अच्छे दिनचे स्वप्न हे सरकार पूर्ण करेल काय या चिंतेत सर्वजण आहेत. जालना जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नुकतेच केंद्रातील वरिष्ठ अधिका-यांचे पथक मंगळवारी येऊन गेले. त्यांनी बदनापूर तालुक्यातील जवसगाव आणि जालना तालुक्यातील बेथलम येथे पाहणी केली. मात्र एका तासाच्या पाहणीत जर त्यांना दुष्काळ कळत असेल तर मग त्यांनी हवाई पाहणी केली असती तरी बराचवेळ वाचला असता अन् मदतही लवकर मिळाली असती. हे पथक आल्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांचे प्रश्न हिंदीतून असल्याने बळीराजाची तारांबळ उडाली. अनेकांनी या पथकाकडे चारा-पाण्याची व्यवस्था ही तातडीने करण्याची मागणी केली. तर काही शेतकºयांनी शेततळ्यासाठी लागणारी प्लास्टिकची पन्नी देण्याचे सांगितले. परंतु दुर्दैव हे की, या पथकातील सदस्यांनी हम कुछ देणे नही..सिर्फ देखने आये है..असे सांगून शेतकºयांच्या आशेवर पाणी सोडले. या शिष्टमंडळात जे अधिकारी होते निश्चितच त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ होते.
परंतु दुष्काळाची पाहणी करण्यासाठी ज्यांना शेतीतले कळते अशांना या पाहणी पथकात सहभागी करून घेतले असते तर यामुळे बळीराजाला आणखी विश्वास वाटला असता. नसता हा दौराही एक उपचार म्हणून रहिला तर मात्र, बळीराजाची ताकद काय असते ते आगामी काळातील राजकीय मैदानातून दिसून येणार आहे. केवळ शेतकºयांची मने जिंकून सरकार काही तरी करत आहे, असे भासविण्यापेक्षा काही तरी ठोस येत्या एक-दोन महिन्यात मिळाल्यास या पाहणी दौ-याचे फलित म्हणावे लागेल.

Web Title: Due to the release of famine without the help of guests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.