संसारात अडकून पडल्याने संसार होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 01:20 AM2019-02-24T01:20:55+5:302019-02-24T01:21:40+5:30
आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करुन भरघोस उत्पन्न घेऊन आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन कृषीभूषण विजणअण्णा बोराडे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेती करणे हा एक संसारच आहे. शेतकऱ्यांना यात अडकून न पडता आलेल्या अडचणीवर मात करावी. आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करुन भरघोस उत्पन्न घेऊन आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन कृषीभूषण विजणअण्णा बोराडे केले.
शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी माल सुविधा केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विजयअण्णा बोराडे उपस्थित होते. व्यासपीठावर राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी. आ. संतोष सांबरे, बाजार समितीचे संचालक मंडळातील सभासद, सभापती पांडुरंग डोंगरे, सचिव गणेश चौगुले यांच्यासह शेतक-यांची मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
मराठवाड्यातील पहिले शितगृह बाजार समितीत सुरु केल्याने बोराडे यांनी आनंद व्यक्त केला. याचा फायदा शेतक-यांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्र सातत्यपूर्ण सुरु ठेवण्याचे गरज आहे. जणेकरुन शेतक-यांना याचा दीर्घकाळ फायदा घेता येईल. एकट्याने शेती करण्याचे दिवस संपले आहे. शेतक-यांनी एकत्र येत कल्टर तयार करुन शेती करण्याची गरज आहे. यामुळे तुमच्या शेतमालाला चांगला भाव मिळू शकेल. कारण सध्या शासनाचे शेतमाल बाहेर देशात पाठविण्याकडे म्हणावे तेवढे लक्ष राहिले नाही. यामुळे आपल्या मालाला आपणच बाजारपेठ उभी करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बोराडे यावेळी म्हणाले.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेती करणे अवघड जात आहे. असे असताना आपला संसार आपणालाच करावा लागणार आहे. यासाठी शेतक-यांनी खचून न जाता शासनाच्या विविध चांगल्या योजनांचा फायदा घेऊन खंबीरपणे उभे राहावे, शेतक-यांनी बाजाराची मागणी ओळखून पीक घ्यावे. कमी शेती असताना परिस्थितीवर मात करत यशस्वी शेती करणाºया शेतकरी पुुंजारास भुतेकर, आणि शिंदे या जिल्ह्यातील शेतक-यांचे उदाहरण यावेळी बोराडे यांनी उपस्थितांना दिले.
शेतक-यांनी रडत बसण्यापेक्षा स्पर्धा करणे शिकले तर नक्कीच मार्ग सापडतो असे शेवटी बोराडे यांनी सांगितले. बाजार समितीत मराठवाड्यातील पहिले शीतकेंद्र सुरु केल्याचा आनंद व्यक्त केला. याचा शेतक-यांना चांगला फायदा होईल. असे राज्यमंत्री तथा बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव गणेश चौगुले यांनी केले. उपसविच जगदीश इंगळे, मोहन राठोड, अनिल खंडाळे, सुरेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.