भाविकांनाही बसणार पाणीटंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:00 AM2018-01-13T01:00:39+5:302018-01-13T01:01:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजूर : येथे श्री जन्मोत्सवानिमित्त होणाºया हरिनाम सप्ताहासह कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू असताना पाणीटंचाईने घर करायला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : येथे श्री जन्मोत्सवानिमित्त होणाºया हरिनाम सप्ताहासह कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू असताना पाणीटंचाईने घर करायला सुरुवात केली आहे. दोन दिवसांत जन्मोत्सव कार्यक्रम सुरू होणार असून अगोदरच नागरिक पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त आहे. त्यामुळे श्रींच्या चरणी माथा टेकवण्यासाठी जिल्हाभरातून येणाºया हजारो भाविकांना पाणी समस्येचा फटका बसणार आहे. ग्रामपंचायतीकडूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.
राजूर गावासह राजुरेश्वर मंदिरासाठी चांदई एक्को प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. परंतु या प्रकल्पाची पाणीपातळी सध्या घटली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. १४ जानेवारी पासून राजुरेश्वर मंदिराच्या पायथ्याशी श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू होत आहे.
या सोहळ्यास दररोज हजारो भाविक हजेरी लावतात. मुक्कामी राहणाºया भाविकांची संख्या मोठी असते. मुक्कामी राहणाºया भाविकांना पाण्याची गरज लागणार आहे. सरपंच भाऊसाहेब भुजंग, ग्रामविकास अधिकारी एस. बी. शिंंदे यांनी गेल्या महिन्यात पंचायत समितीकडे पाच शासकीय पाणीपुरवठ्याचे टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. सोहळा एक दिवसांवर येऊन ठेपलेला असून टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थ व भाविकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी शासकीय पाणीपुरवठ्याचे टँकर लवकर सुरू करावे, अशी मागणी उपसरपंच विनोद डवले, ग्रामपंचायत सदस्य राहुल दरक यांनी केली आहे.