दत्तजयंती संगीतोत्सवाचा सूर घुमणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:23 AM2017-12-03T00:23:15+5:302017-12-03T00:23:21+5:30
अंबडमधील दत्तजयंती संगीत महोत्सव ही शास्त्रीय संगीतात रौप्यमहोत्सवी परंपरा संगीतोत्सव निधीअभावी खंडित झाला होता. यंदा कलाकार आणि रसिकप्रेक्षकांच्या आग्रहामुळे संगीतोत्सावाचा सूर घुमणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : अंबडमधील दत्तजयंती संगीत महोत्सव ही शास्त्रीय संगीतात रौप्यमहोत्सवी परंपरा संगीतोत्सव निधीअभावी खंडित झाला होता. यंदा कलाकार आणि रसिकप्रेक्षकांच्या आग्रहामुळे संगीतोत्सावाचा सूर घुमणार आहे. ३ ते ४ डिसेंबर रोजी हा महोत्सव होणार आहे.
स्व.गायनाचार्य गोविंदराव जळगावकर यांनी अंबडला राहण्यास आल्यावर व्यापकपणे साजरा करायला सुरु वात केली. त्यांच्या निधनानंतर दहा वर्षांपासून उत्सवाची लोकप्रियता शिगेला पोहोचली. मात्र गेली दोन वर्षे हा संगीतोत्सव आर्थिक नियोजन नसल्याने होऊ शकला नाही. अंबडचे संगीतप्रेमी नागरिक आणि राज्यभरातील रिसकांनी पुढाकार घेतला आहे.
यंदा ३ व ४ डिसेंबर या दोन रात्री दत्तजयंती निमित्त पुन्हा देशभरातील दिग्गज गायक-वादक आपली कला सादर करू शकतील.