संसाराची जबाबदारी पार पाडून कुटुंबावर संस्कार रुजविणे हे महिलांचे कर्तव्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:00 AM2019-03-08T00:00:40+5:302019-03-08T00:01:06+5:30
बेटी ही पराया धन म्हणून जी ओळख असते, ती खरीच असते. ती दोन्ही कुटुंबांतील दुवा ठरते.
संजय देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हिंदू संस्कृतीत महिलेला शक्तीचे स्थान दिलेले आहे. महिलेच्या हातातच संसाराची दोरी असते. घरातील अन्नपूर्णा, लक्ष्मी म्हणूनही महिलांकडे पाहिले जाते. बेटी ही पराया धन म्हणून जी ओळख असते, ती खरीच असते. ती दोन्ही कुटुंबांतील दुवा ठरते. विवाह झाल्यावर तिचे सासरच हे तिचे सर्व काही असते. पती सोबतच सासू-सासरे, दीर, नणंद आणि घरातली मुले-मुली हा त्यांचा एक परिवार म्हणजेच तिचे सर्वस्व असते.
अशाच एका संस्कारित घरातून अंबड माहेर असलेल्या माधवी यांचा विवाह जालना येथील प्रसिध्द उद्योजक दिनेश राठी यांच्या सोबत इ. स. २००० मध्ये झाला. त्यांना दोन मुले असून, एक बारावीत तर दुसरा इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. माधवी यांचा विवाह होऊन त्या राठी परिवाराच्या सून झाल्यावर त्यांनी आई-वडिलांकडून मिळालेले संस्कार येथेही रूजविले. व्यवसायाने त्यांचे पती हे स्टीलचे मोठे उद्योजक असल्याने त्यांना व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे लागते. त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी मी आणि माझ्या सासूबार्इंवर असते. सासूबाई आणि मी आम्ही दोघी मिळून घरातील सर्व व्यवहार, परिवाराची जबाबदारी सांभाळतो. सासरे कांतीलाल राठी हे माहेश्वरी विवाह समितीचे मोठे कार्य करतात. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी घरातील सर्व जण त्यांना समजावून सांगातात आणि दोन्ही मुले देखील आमच्या शब्दाच्या पुढे नसल्याचे समाधान आहे. घरातील प्रत्येक गोष्ट आणि वस्तू या नीटनेटक्या राहाव्यात हा प्रयत्न असतो, त्याकडे मी जास्त लक्ष केंद्रित करते. महिलांनी त्यांच्यावर असलेली कुटुंबाची जबाबदारी सांभाळूनच अन्य कामांना प्राधान्य दिल्यास कुटुंबासह बाहेरही संतुलन साधता येते हे विसरून चालणार नाही.