आष्टीत डेंग्यूसदृश आजाराचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:47 AM2018-05-05T00:47:49+5:302018-05-05T00:47:49+5:30

परतूर तालुक्यातील आष्टी येथे डेंग्यू सदृश आजाराचा रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून मागील दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक ही सतर्क झाले असून घरोघरी जाऊन पथक अळ्यांची तपासणी करीत आहेत.

Dysfunctional suspected pelvic patient was diagnosed with anxiety | आष्टीत डेंग्यूसदृश आजाराचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

आष्टीत डेंग्यूसदृश आजाराचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे डेंग्यू सदृश आजाराचा रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून मागील दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक ही सतर्क झाले असून घरोघरी जाऊन पथक अळ्यांची तपासणी करीत आहेत.
आष्टी येथील सार्थक प्रल्हाद कडणे या पाच वर्षीय मुलाच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याने व ताप येत असल्याने त्याच्यावर जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथील डॉक्टरांना डेंग्यूचा संशय आल्याने आरोग्य विभागास कळविले आरोग्य विभागाने तात्काळ याची दखल घेत रुग्णाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहेत. तसेच आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कळविले यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गिरी यांनी गावात पथक स्थापन करून घरा- घरात तापाच्या व साथीच्या रुग्णाचा शोध घेतला जात आहे तसेच गावातील पाण्याची तपासणी करण्यात येत आहे आरोग्य विभागाने सदरील संशयित रुग्णच्या आई -वडिलांसह नातेवाईकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले असल्याचे सांगितले आहे या पथकात आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गिरी कर्मचारी काटे, कुलथे, फपाळ, टिकले ऊक्लगावकर, रायगुडे, मोरे यांच्यासह १० आशा स्वयंसेवी कार्यकर्त्यां यांचे प्रत्येकी पाच जणांचे पथक स्थापन करण्यात आले आहे, याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ कैलास गिरी म्हणाले की, डेंग्यूचा संशयित आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र आरोग्य विभागाच्या वतीने दक्षता घेतली जात असून आठ दिवस पथक घरा - घरात जाऊन तपासणी करणार आहे तसेच ग्रामपंचायतला ही धूरफवारणी करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले असल्याचे गिरी यांनी नमूद केले.

Web Title: Dysfunctional suspected pelvic patient was diagnosed with anxiety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.