‘ई-नाम’ तीन वर्षांपासून कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:04 AM2019-11-15T00:04:10+5:302019-11-15T00:05:29+5:30

र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बाजार समिती संदर्भात ई-नाम प्रणालीचा उल्लेख करुन खळबळ उडून दिली आहे. ही प्रणाली अंमलात आणणाऱ्या बाजार समित्या बरखास्त का ? करण्यात येऊ नये असे सांगून व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे.

'E-Name' has been in operation for three years | ‘ई-नाम’ तीन वर्षांपासून कार्यान्वित

‘ई-नाम’ तीन वर्षांपासून कार्यान्वित

Next
ठळक मुद्देजालना बाजार समिती : एमएसईपी अंतर्गत जालन्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार यापूर्वीच झाले आॅनलाईन पद्धतीने

संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बाजार समिती संदर्भात ई-नाम प्रणालीचा उल्लेख करुन खळबळ उडून दिली आहे. ही प्रणाली अंमलात आणणाऱ्या बाजार समित्या बरखास्त का ? करण्यात येऊ नये असे सांगून व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. असे असलेतरी जालना बाजार समितीने या पूर्वीच एमएसईपी अंतर्गत ई-नाम प्रणालीचाच एक भाग असलेला व्यवहार सर्व आॅनलाईन केला आहे. याला आता तीन वर्ष झाली आहेत.
निर्मला सीतारामण यांच्या दिल्लीतील कृषी वित्त परिषदेमध्ये मार्गदर्शन करतांना बाजार समित्यांची कार्यपध्दती आणि कामकाज यावर गंभीर टिप्पणी केली. यामुळे जालना बाजार पेठेतही याचे पडसाद उमटले. यांसदर्भात जालना बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर तसेच निवृत्त सचिव गणेश चौगुले यांच्याशी याप्रकरणी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जालना बाजार समितीने तत्कालीन कृषी आयुक्त सुधीरकुमार गोयल यांच्या सुचनेनुसार एमएसईपी अंतर्गत आॅनलाईन व्यवहार सुरु केले होते.
त्यात शेतकºयांनी आणलेल्या शेतमालाची नोंद आॅनलाईन घेण्याची पध्दती सुरु केलेली आहे. याअंतर्गत आजघडीला १ लाख ८० हजार शेतकºयांची नोंदणी झालेली आहे.
जालना बाजार समितीने २०१६ मध्ये ही प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे या अर्थमंत्री सीतारामण यांच्या घोषणेचा जालन्यातील बाजार समिती तसेच आडत व्यापारी आणि शेतकºयांवर कुठलाच विपरीत परिणाम होणार नाही.
ही प्रणाली २००९ मध्ये राबविण्याचे तत्कालीन आघाडी सरकारने जाहीर केले होते. या अंतर्गत जालन्यासह राज्यातील ४० पेक्षा अधिक बाजार समित्यांनी आपले व्यवहार आॅनलाईन केले आहेत. बाजार समित्या या शेतकरी आणि व्यापाºयांसाठी महत्वाची भूमिका निभावतात. शेतकºयांनी उत्पादीत केलेला माल विक्रीसाठी कुठे आणावा हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच बाजार समित्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. आता या नवीन नियमामुळे बाजार समित्यांना आपले सर्व व्यवहार हे संगणकीकृत आॅनलाईन व्यवहाराव्दारे करावे लागणार आहे. शेतमालाची पारंपारिक पध्दती बंद होवून आता केंद्र सरकार राष्ट्रीय बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आणू पाहत आहे. याचाच एक भाग म्हणून ई-नाम अर्थात इलेक्ट्रॉनिक नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.

आम्ही काळाची गरज ओळखतो
आजचे युग हे इंटरनेटचे युग म्हणून ओळखले जात आहे. प्रत्येक गोष्ट डिजिटल होत चालली आहे. त्यामुळे जालना बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळाने तत्कालीन कृषी आयुक्त सुधीरकुमार गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ई-नाम समकक्ष एमएसईपी अंतर्गत आॅनलाईन व्यवहार सुरु केले होते. भविष्यात आणखी नवीन सूचना प्राप्त झाल्या तर त्याचीही आम्ही अंमलबजावणी करु.
- अर्जुन खोतकर,
सभापती तथा माजी राज्यमंत्री

Web Title: 'E-Name' has been in operation for three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.